Rojgar Hami Yojana Maharashtra 2023

 

 Rojgar Hami Yojana Maharashtra   2023 



Rojgar Hami Yojana
Rojgar Hami Yojna 



रोजगार हमी योजना महाराष्ट्र


 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हि केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना लाभार्थ्यांना कुशल व अकुशल रोजगार दिला जातो.
यामध्ये ९० दिवस रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे. व त्याहून अधिक त्या नंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार पुरविल्या जाते. 


महाराष्ट्र रोजगार हमी अधि नियम १९७७ पासून महाराष्ट्रात याची अंमलबजावणी सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू करण्यात आल्या.

अकुशल व्यक्तींकरिता ग्रामीण भागात रोजगार हमी योजना हि राबविण्यात आली.

महाराष्ट्र रोजगार हमी योजना अधिनियम १९७७ कलम ७ ( २ ) (१०) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना. सदर योजनांना राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य केले जात होते. सन २००५ मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम ( विद्यमान नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम ) लागू केला.

वरील ठरलेल्या कलम नुसार महाराष्ट्र शासनाने सन २००६ पासून पूर्वीचा कायदा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विधिमंडळाने केंद्रीय कायदयास अनुसरुन राज्यास निधी मिळण्याच्या अनुषंगाने १९७७ च्या कायदयात आवश्यक त्या सुधारणा केल्या, त्यामुळे योजना राबविण्याच्या कार्यपध्दतीत बदल झाला आहे. सद्य : स्थितीत राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७  ( सन २००६ मध्ये बदल केल्याप्रमाणे ) अंमलात आहे, व या योजने अंतर्गत खालील दोन योजना सुरु आहेत. 

Rojgar hami yojana maharashtra

रोजगार हमी योजना

रोजगार हमी योजना ( नरेगा योजना ) काय आहे? महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ( नरेगा योजना ) भारतात ७ सप्टेंबर २००५  पासून लागू करण्यात आली. जे सार्वजनिक कामाशी संबंधित अकुशल श्रम करण्यास इच्छुक असतात, अशा कोणत्याही ग्रामीण कुटुंबातील सदस्यांना या योजनेअंतर्गत १०० दिवसांचा रोजगार प्रदान केला जातो. सन २०१०/२०११  या आर्थिक वर्षात मनरेगा योजनेसाठी केंद्र सरकारचा खर्च ४०,१००  कोटी रुपये होता.

Maharashtra Rojgar Hami Yojana महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगार नागरिकांना रोजगार प्रदान केला जातो. असे सर्व नागरिक जे शारीरिकदृष्ट्या श्रम करण्यास सक्षम आहेत, त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. वर्ष १९७७ मध्ये महाराष्ट्र सरकार द्वारे बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देश्याने रोजगार अधिनियम लागू करण्यात आला.


या अधिनियम अंतर्गत दोन योजनांचे संचालन केले जाते. त्यापैकी एक महाराष्ट्र रोजगार हमी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात बेरोजगार नागरिकांना कमीत कमी १०० दिवसांचा रोजगार प्रदान केला जातो. महाराष्ट्र मध्ये मंजुरी दर निश्चित करण्यात आला. रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार होते. केंद्र सरकार द्वारे वर्ष २००८ मध्ये ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली. देशभरात या योजनेला महात्मा गांधी रोजगार गॅरंटी अधिनियम या नावाने ओळखले जाते. 

Rojgar hami yojana maharashtra

ग्रामीण रोजगार हमी योजना ( नरेगा ) अंतर्गत कामे / उपक्रम कोणते?

मनरेगा ग्रामीण विकास आणि रोजगार मिळवून देण्याचे दुहेरी ध्येय साध्य करते. मनरेगा मध्ये नमूद केलेली कामे ग्रामीण विकास उपक्रमांकडे केंद्रित असतात.

ज्यामध्ये ग्रामीण कनेक्टिव्हिटी , जलसंधारण,
पूरनियंत्रण आणि संरक्षण बांध तसेच दुरुस्ती सीपेज टाक्या , लहान बंधारे, वनीकरण , उत्खनन , नवीन तलाव इत्यादी कामांवर भर दिला जातो. तसेच या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारास जमीन सपाटीकरण , वृक्षारोपण यासारखी देखील कामे दिली जातात.

Rojgar hami yojana maharashtra

रोजगार हमी योजना महाराष्ट्र साठी पात्रता

• अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
• केवळ ग्रामीण भागात राहणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
• अर्जदार हा १० वी पास असावा.
• अर्जदाराचे वय हे कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असावे.
• अर्जदार हा दारिद्र्य रेषेखालील असावा. 

Rojgar hami yojana maharashtra

आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड.
  •  रहिवासी प्रमाणपत्र 
  •  उत्पन्नाचा प्रमाणपत्र 
  •  रेशन कार्ड
  •  पासपोर्ट आकाराचा कलर फोटो 

Rojgar hami yojana maharashtra


महाराष्ट्र रोजगार हमी योजना किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करू शकता.

  •  सर्वात पहिल्यांदा तुम्हाला MANREGA च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. तुमच्या समोर योजनेचे मुखपृष्ठ उघडेल. त्यानंतर तुम्हाला Register या बटन वर क्लिक करावे लागेल.
  • पुढील पृष्ठावर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल. नंतर Register या बटन वर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती Submit करावी लागेल. वरील प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला Login या बटन वर क्लिक करावे लागेल.

  • Rojgar hami yojana maharashtra

  • तुमच्या समोर लॉगिन पर्याय उघडेल. या फॉर्म मध्ये तुमचे Username आणि पासवर्ड भरून Login बटन वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुमच्या समोर एक अर्ज उघडेल. या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरून सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
  • वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. वरील प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल
  • रोजगार हमी योजना महाराष्ट्र 

Post a Comment

0 Comments