शेती वारसान करणे | वारसान नोंद कशी करायची वारसान (Affidevit) Format | शेती वारस नोंद

 

शेती वारसान करणे | वारसान नोंद कशी करायची

वारसान (Affidevit) Format | शेती वारस नोंद

 

वारसान (Affidevit) Format

वारसान (Affidevit) Format



नमस्कार मित्रानो आज आपण या ब्लोग मध्ये पाहणार आहे.

कोणत्याही शेतकऱ्यांचा  मृत्यू झाल्यास.  त्या शेतकाराचे वारसान मुलगा, मुलगी, पत्नी किंवा इतर कोणी नातेवाईक वारस नोंद कशी Online घर बसल्या तलाठी कार्यलयात न जाता आपल्या मोबाईल, PC, किवां Laptop वरून वारस नोंद कशी करायची.

 हे आज आपण या ब्लोग मध्ये सविस्तर पणे पाहणार आहे.

तर सर्वात आधी या साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहूया.



शेती वारसान आवश्यक कागदपत्रे 👇

१)     मृत्यू शेतकऱ्याचा मृत्यू दाखला

२)     सर्व वारसांचे आधार कार्ड

३)     १०० रुपयाचे स्टेम्प पेपर

४)    एक १० रु. कोर्टाची तिकीट

 हि सर्व कागदपत्रे तयार करून खालील दिलेल्या प्रमाणे वारस नोंद करावी .


 

१)     सर्वात मी खालील दिलेले म्याटर आधी १०० रुपयाचे स्टेम्प पेपर वर पेनाने लिहून किंवा

मी दिलेली Word File डाउनलोड करून ती १०० रुपयाच्या स्टेम्प पेपर व प्रिंट करून घ्यावे.


१०० रुपयाच्या स्टेम्प पेपर व प्रिंट....👉

Word File

 

१)                               नंतर आपले सरकार पोर्टल वर जाऊन मी दिलेल्या Video Link प्रमाणे त्या स्टेम्प पेपर ला

Affidevit करून घ्यावे. 'Affidevit' हे कोणत्याही एका वारस च्या नावाने करावे.

 Affidevit  हे तुम्ही महा ई सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल किंवा तहसील सेतू यातील एक कोणत्याही माध्यमाने तुम्ही Affidevit तयार करू शकता.

२)                              Affidevit तयार झाल्या नंतर तुम्ही दोन माध्यमाच्या साह्याने वारस नोंद करू शकतात.

१)     तलाठी कार्यलयात मी सागितलेले सर्व कागदपत्रे Affidevit सोबत जमा करून आपली वारस नोंद पूर्ण करू शकतात. Affidevit) Format

      हि नोंदणी पूर्ण करायला व ७/१२ मध्ये नाव यायला १ महिना लागू शकतो.

२)     वारस नोंदणी Online सुध्या करता येते. त्या आपल्याला 

      या पोर्टल वरून https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin 👇

 

                     कोठेही न जाता आपल्याला  घर बसल्या online करता येते या प्रकिरेची

सुध्या आपल्या चेनल वर Video दिली आहे ती तू तुम्ही नक्की पहावी आणि

माहिती चागली वाटल्यास आपल्या   चेनल ला नक्की सबस्क्राइब 👇 करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राना शेयर करायला आणि व्हिडिओ लाईक 👍 करायला विसरू नका.

 

तर अश्या प्रकारे हि शेती वारसान करणे बदल माहिती आहे . माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवाना नक्की शेयर करा आणि आपले सर्व CSC चालकांना हा ब्लोग शेयर नक्की करा कारण कोणताही शेतकरी अशा या माहिती पासून वंचित रहायला नको. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की कळवा

आम्ही त्या वर नक्की सुधारणा करू तर वारसान "Affidevit) Format"  आपल्या या ब्लोग पेज ला नक्की फॉलो ठेवा असेच नव नवीन अपडेट तुमच्या पर्यंत पोहचत राहतील.

 

 

                                          धन्यवाद .........


खालील दिलेले म्याटर १०० रुपयाचे स्टेम्प पेपर वर पेनाने लिहून किंवा मी दिलेली वरील Word File डाउनलोड करून ती १०० रुपयाच्या स्टेम्प पेपर व प्रिंट करून घ्यावे.

 

 

 

कोर्ट  विदयमान  कार्यकारी  दंडाधिकारी  साहेब, ................

तहसिल  कार्यालय  ............., जि.  ..............

 

प्रतिज्ञार्थी -:        .................................................................. 

                       वय : ......... वर्ष व्यवसाय : ......................... 

             रा. .......................... ता. ........................... जि. .................

 प्रतिज्ञालेख 

       मी प्रतीज्ञार्थी वरील पत्ता वरील रहिवासी असून खुद प्रतिज्ञेवर जाहीर करतो कि,

माझे वडील नामे. .................................................... हे दिनांक ..................... रोजी

गाव ................................  येथे मरण पावले असून त्यांचे वारसान...   

               वारसांची नावे                                      मायताशी नाते

 

१)      ..............................................................                    ..............................

२)      ..............................................................                    ..............................

३)      ..............................................................                    ..............................

४)      ..............................................................                    ...............................

 

वरील प्रमाणे वारस असून या शिवाय कोणीही वारस नाही.

माझे वडील नामे ................................................... यांचे नावाने राजस्व रेकार्डला

मौज .......................... ता. ........................... जि. ..................... येथे

     सर्वे नं. .......................,    क्षेत्र हे. आर ...................., जमा रु. ................., हक्क वर्ग १

     वरील प्रमाणे शेती असून या शेतीचा वारसान फेरफार घेणे करिता प्रतिज्ञालेख सादर

 

दिनांक ....................                             सही ........................................

 

सत्यापन

 

मी वरील प्रमाणे लिहून मजकुर सत्य आहे. सदर मजकूर चुकीचा आढळून आल्यास मी भारतीय दंड विधान कलम 199,200,193 (२) नन्वये शिक्षेस पात्र राहिल. आज दिनाक ०३/११/२०२३ रोजी कोर्ट विद्मान कार्यकारी दंडाधिकारी, नरखेड यांचे कोर्टात प्रतिज्ञालेख लिहून सही केली.

   

स्थळ – .................                                                                                             प्रतिज्ञार्थी सही 

 

 

  

दिनाक .....................                                                                      मी प्रतिज्ञार्थी ओळखतो ( साक्षीदार ) सही 

 

 

आपण या ब्लोग पेजला भेट दिल्या बदल तुमचे अत्यंत रुनी राहील

धन्यवाद.....




Post a Comment

0 Comments